भिक्षेकरीचा " मसीहा"डॉ. अभिजित पांडुरंग सोनवणे.

लोकनिर्माण प्रतिनिधी /यशवंत नारायणकार ) 


        देव डोळ्यांना दिसत नसला, तरी  देवाला सुद्धा खोटे  ठरवणारे लोक आहेत.
               रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा..
             आज देव डॉ.अभिजीत  आणि सौ. मनिषा सोनवणे. यांच्या सेवेतून दिसतो, हे खरे आहे. ज्या विभुतीला आम्ही ईश्वर मानतो.ते आमच्या दुःखाचे  निवारण करतो. 
           डॉ.अभिजीत हे भिक्षेकरीचा ईश्वर आहेत, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांचे कार्य नुसते डॉक्टरी करून पैसा कमवणे  नसून एक ईश्र्वराच्या कार्यत हातबार आहे. 
          कुठल्याही वैयक्तिक स्वार्थाने नसून फक्त सेवा भावी वृत्तीने त्यांनी हे कार्य स्वीकारलेले आहे. कारण डॉक्टर म्हणजे, पैसा  गाडी बंगला ऐश्वर्य हे सर्व अपेक्षित असते. कारण डॉक्टर होण्यासाठी लागलेला  पैसा  लाखाच्या घरात असतो. आणि तो वसूल करण्याचे काम काही डॉक्टर  मोठ्या प्रमाणात खर्‍या-खोट्या मार्गाने पैसा वसूल करण्याचे काम करत असतात. पण डॉ. अभिजीत हे लाखातून एकच असे महान विभूती जन्मली आहे .की जीवनात पराकष्ठ त्रास घेवून आपला मार्ग निवडला आहे. यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टराचे कार्या धर्मसार्थक केले आहे. 
          हा माणूस आज भिक्षुक लोकांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्याकडून कुठलेही अपेक्षा न करता सेवा रुपी भावनेने त्यांचा इलाज मोफत संलग्न 14/15 वर्ष करीत आहेत.




                     आपले जीवन त्यांच्यासाठी समर्पित केले आहे . हे कितीतरी मोठी भाग्याची आणि पराकोटीची सेवा आहे. आज कोरोना सारख्या रोगाचे थैमान असताना सुद्धा स्वतःला कोरोनाच्या अग्निकुंडात झोकून भिक्षुक लोकांची कोरोना मुक्त सेवा पुणे शहरात करीत आहेत. आज अशा निराधार लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून त्यांनी त्यांना कोरोनापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परमेश्वराने  त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला असावा. हीच खरी सेवा पूजनीय आणि सरांनी आहे.
            कुठलीही सामाजिक स्वार्थी मंडळांच्या अपेक्षा, कौतुक पुरस्कार आणि सत्कार यांना कसलीही अपेक्षा न करता आपले कार्य त्यांनी समाजासमोर बुलंद केले आहे. मानवजातीचा एक इतिहास करून दाखवला आहे. आज त्यांचा समाज सुद्धा त्यांच्यासमोर लाजीरवाणा झालेला आहे.
              समाजातील मी म्हणणारे नेतेमंडळी  गल्ला भरो डॉक्टर संघटना. यांनी त्यांची दखल सुद्धा घेतलेली दिसत नाही. कारण सेवा करणाऱ्यालाच सेवा दिसते. ज्यांना सेवेचा गंधच नाही त्यांना सेवा काय दिसणार आहे. ही समाजीक संघटनाची शोकांतीका आहे. 
         दिनांक 23 मे 2020 रोजी झालेल्या एबीपी माझा मुलाखतीत त्यांनी सांगितले. की   डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील यांना सुद्धा आपल्या या कार्यात समाजकार्य घडवता येते. हे त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतलेला आदर्श सांगितले आहे.  
              डॉक्टर अभिजीत व त्यांच्या पत्नी सौ डॉ. मनिषा यांचे कार्य हे महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या यादीमध्ये त्यांच्या कार्याची नक्कीच नोंद  घेतली जाईल. आणि पद्मश्री सारख्‍या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जाईल. यात तिळ मात्र सुद्धा शंका नाही. आमच्या सर्व समाजबांधवांच्या भावी आयुष्यात आपल्या कार्याची नोंद नक्कीच केली जाईल आणि आपला आदर्श हा समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल. आपणास शुभेच्छा आणि शंभू महादेवाचा आशीर्वाद.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image