उस्मानाबाद /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विषयाचे, प्राध्यापक राजा जगताप यांनी कोरोना संकटात लाॅकडाऊनच्या परिस्थितीत कोरोना संबंधातील वेगवेगळ्या विषयावर सातत्याने लेखण करून विविध विषयावर जागृती केली होती व गरजूंना मदतही केली होती व उस्मानाबाद परिसरात शासकीय यंञणांनी उभारलेल्या "निवारा केंद्रात"क्वारंटाईन केलेल्या परप्रांतीय विद्यार्थी व मजूर यांची तेथे जावून प्रत्येक्ष भेटी घेवून त्यांच्या सोई व सुविधा, समस्या अशा विविध समस्या त्यांनी आपल्या लेखणातून मांडल्या होत्या व शहरातील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी परप्रांतीय विद्यार्थी व मजूर यांना केलेले अन्नदान व केलेले किटचे वाटप त्यावेळी तेथे कोरोनाला न घाबरता प्रत्येक्ष जावून लेखण केले होते व सामाजिक बांधिलकी जपली होती .त्यावेळी त्यांनी २५लेख सातत्याने लिहिले होते व उस्मानाबाद येथील विविध स्थानिक दैनिकातून लेख प्रसिध्द झाले होते, याची दखल घेऊन दादासाहेब फाळके आयकाॅन फिल्म अवार्ड, मुंबई या संस्थेच्या वतीने प्रा.राजा जगताप यांना "कोरोना योध्दा" सन्मानपञ देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच प्रा.राजा जगताप यांनी कोरोना संबंधी केलेले लेखण व त्यांचे सामाजिक कार्य पाहून समस्त जोगी समाज महासंघ, दिल्ली. या संस्थेच्या वतीने "कर्मवीर कोरोना योध्दा" सन्मानपञ देऊन त्यांचा गौरव केला आहे .श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड आॅल इंडिया काँग्रेस, नवी दिल्ली.इंडियन प्रेस असोसिएशन उत्तरप्रदेश ,मानसिकता समाचार सहारनपूर,उत्तरप्रदेश. महाराष्ट्र पञकार संघ,प्रेस संपादक व पञकार सेवा संघ,झी२४न्युज लाईव्ह,औरंगाबाद.दार्शनिक समाचार मुंबई,साप्ताहिक पुणे प्रवाह,आपला समाज मागर्गदर्शक,पुणे यांनीही त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
तसेच महाराष्ट्रातील ईगल फौंडेशन रत्नागिरी,डिझाईअर फौंडेशन ठाणे,आविष्कार फौंडेशन कोल्हापूर,मदर टेरेसा फौंडेशन,संस्थान,मा.अभिनेते विवेक ओबेराय प्रमुख असलेल्या मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली, मानवाधिकार संरक्षण समिती महाराषट्र राज्य,पोलीस फ्रेण्डस वेलफेअर असोसिएशन पुणे,यांनी प्रा.राजा जगताप यांना "कोरोना योध्दा"म्हणून पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र,दिल्ली व उत्तरप्रदेश येथील विविध फौंडेशन,सामाजिक संस्था,साप्ताहिके यांनी "कोरोना योध्दा "म्हणून गौरव केला आहे त्यांनी कोरोना संबंधित केलेल्या लेखणाला विविध ३८पुरस्कार प्राप्त झाले आहेत.