वेडा उत्तम... 

 


काळ होता  पंचवीस तीस  वर्ष पूर्वीचा. माझं नुकतंच शिक्षण अर्ध्यातून सुटलं होतं. वडील गेले घराची जबाबदारी अंगावर  आली होती.शेतीत कधी कामाला माणूस लावावा लागे.  


गावात एक उत्तम नावाचा  मुलगा जो माझ्या पेक्षा लहान आणि  वेडा होता. नव्हे परिस्थिती मुळे त्याला वेड लागले होते . त्याचे वडील दुसऱ्यांच्या घरी सालगडी म्हणून काम करत .  बहिणी सासरी गेलेल्या.  त्यात आई वारली घरात खाऊ घालण्यासाठी कोणीच नाही. त्याचे वडील कामाला जातं उत्तम ला स्वतःची भाकरी बनवता येतं नसे. तो ज्याच्या कडे निंदणी किंवा कुठं पाणी भरण्यास जाई तेथेच शेतमालक त्यास खाऊ घाले. मजुरी तुन उत्तम स्वतःच्या वेडसर पणाच्या  गोळया  महिन्यातून एकदा पैसे जमले की जिल्ह्या वर जाऊन आणत असे.. आमच्या कडे नियमित तो कामास येई . कधी पाणी भरण्यास पाठवलं तर पाणी ज्या सरी मध्ये सुरु राही शेवटी  दुसऱ्यांच्या शेतात वाहत जाई पण त्याच लक्ष नसे. शेजारी शेतकऱ्यांना माहिती झाले होते उत्तम हा वेडसर त्यास कोणी बोलत नसे. अशा सवयी मुळे लोक त्यास कमीच काम सांगत पण माझ्या कडे तो नियमित येतं असे मीही काम कमी का करेना पण त्याच्या परिस्थिती मुळे त्याला कामास बोलवत असू. कधी काम नसलं तर त्यास जेवणाचे हाल होतं. कोणी शेजारी काही खाण्यास देत असतं. त्यात त्याच आजारपण भूक याने प्रकृती खालावत चालली होती. असंच कोणी तरी त्याला सल्ला दिला असेल कदाचित. मला माहिती नाही पण वाटतं . अरे असं त्रास करण्या पेक्षा पंथाचा एखादा आश्रम असेल तेथे का जातं नाही? जेवणाची सोय होईल तेथे आश्रमात थोडं काम केले तर तुला पण पुण्य लाभेल... देव कार्य घडेल. तुझं असं आजारपण नियमित गोळया  ! तेथे तुला कोणी पण गोळया घेण्यास मदत करेल.  त्यास  ते पटलं असावं त्याच्या घरचे महानुभाव पंथी. म्हणून तो असाच एके दिवशी निघून गेला कुठं गेला कोणालाच माहित नाही. काही दिवस लोटली दोन एक  वर्ष झाली असतील. मी त्याच माझ्या शेतीत गुंतलेलो. माझा दिनक्रम सकाळी उठलो की लवकर शेतात जायचं जेवणाच्या वेळेसच घरी जेवायला यायचं. शेती चार किलोमीटर लांब सकाळी गेलो तर परत बारा एक वाजता येतं असू काही काम करून. आल्यावर खूप भूक लागली असायची. आल्या आल्या हातपाय धुतले की आई जेवणास वाढे. त्या दिवशी घरी आलो तर आई  स्वयंपाक बनवल होती. आलो हातपाय धुवून आईला सांगितले "आई जेवण वाढ खूप भूक लागलीय." तसं आई मला म्हणाली. "अरे "
" उत्तम आलाय तो गावात आल्या आल्या लगेच पहिले आपल्या कडे आला "" पहिली पायरी आपल्या  घरची चढला"   "मला सांगून गेलाय मावशी मला आज आपल्या कडे जेवण करायच आहे". "खूप दिवसांनी तूझ्या हातच जेवण केले नाही " "स्वयंपाक बनवून ठेव" "मी येतो गावात सर्वांना भेटून" ."तो गेलाय गावात." " खूप दिवसांनी आलाय बिचारा".  "खूप सुधारला  महाराज  झाला आहे." " महानुभाव आश्रमात राहतो आता"   "सोबत जेव." "आता तो आपला उत्तम राहिला नाही उत्तम महाराज झालाय". "म्हणून आज थोडा उशीर झाला स्वयंपाक  बनवायला ". पाहुणचारचा खास स्वयंपाक म्हणून आईस उशीर.   गरीब वेडा उत्तम महाराज झाला सुधारला याचा मला खुपच  आनंद झाला.आणि विशेष वाटले .. खूप बरं वाटले ऐकून. मी जेवणा साठी थांबलो त्याची वाट पाहू लागलो. 
     तसं आमच्या कडे कामाला होता तेव्हा पण आम्ही सोबतच जेवण करत असू. जे घरात बनवल असेल ते ताटाला ताट लावून !  कधी परकं किंवा लांब ठेवत नसू . जे असेल ते सारखं जेवायचो मजूर म्हणून दुसरं कधी बनवल नाही. थोडी  वाट पाहिली तर उत्तम आला बरोबर. मी बाहेर त्यास हातपाय धुण्यासाठी पाण्याची बादली भरून दिली. रुमाल धरून उभा राहिलो त्याने हातपाय धुतले. . आईने दोन पाट टाकले होते आमच्या दोघांचे आम्ही पाटावर बसलो.शेजारी तांब्या ग्लास ठेवलेत . आईनं ताट तयार केलेत.  तूप वरण भातावर  फिरवले. मीही ताटाला पाणी फिरवलं आणि  मी उत्तम यास म्हटले. बस  जेवायला.  तो काहीच बोलला नाही. तसं  मी चक्रावलो.  आई म्हटली "अरे आता आपला  उत्तम नाही आता तो महाराज आहे". त्यावर उत्तम बोलला "ताटाला काही लावल्या शिवाय पूजा केल्या शिवाय मी जेवण करत नाही " तोच आई ने मला सांगितले.  त्याच्या "ताटाची पूजा कर मग जेवणास सांग".माझ्या लक्षात आलं आता उत्तम नाही उत्तम महाराज आहेत .  मी पाटावरून  उठलो आईनं कुंकू कुयरी माझ्या हातात दिली. मी उत्तम महाराज यांची  पूजा केली.  ताटाला दक्षिणा लावली.त्यांच्या  पाया पडलो. आणि जेवण करण्यास सांगितलं. मग ते  जेवणास बसले . मीही माझ्या ताटावर जाऊन जेवणास  सुरवात केली. त्या दिवस नंतर परत कधी गावात फिरून उत्तम काही आला नाही आजपर्यंत. मला वाटतं माझी ती शेवटची भेट. उत्तम सोबतची. कुठं तरी आश्रम सांभाळतो आश्रम  प्रमुख म्हणून. असं सांगतात. महंत उत्तम महाराज... किंवा तेथे दुसरं नाव बदलून असेल कदाचित... 


1) वेळ कशी बदलते सांगता येतं नाही. 
2) ज्यांना आपण वेडं म्हणतो त्यांचे पण दिवस पालटू शकतात...ते  उच्च पदावरही जाऊन पोहचतात. 
3) कुणाला कधीच कमी लेखू नये. 
4) नशीब कोणाचं कसं ..कधी  बदलेल सांगता येतं नाही.
 5) आपल्या कामगाराच्या   पण  कधी पाया पडावे लागतील सांगता येतं नाही. 
6) लहान असूनही त्याच्या पाया पडावे लागते ते त्यानं मिळवलेल्या  पदा मुळे... 
  


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव 
मोबाईल. 9922239055©️®️


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image