आज झेंडाचा जन्म झाला !! २२ जुलै २०२०


                             
आज माझा जन्म झाला
अनेक रंगांच्या निवडीच्या
अनेक मतांच्या विचारांचा
२२ जुलै १९४७ रोजी घोषणा केली
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला


पहिला ध्वज १९०६ रोजी कलकत्त्यात
दुसरा ध्वज १९०७ रोजी पॅरिस मध्ये
मात्र,१९२१ रोजी गांधीजींच्या कल्पनेचा ध्वज
१९३१ रोजी सुधारित, आताचा ध्वज
आणि २२ जुलै१९४७ रोजी झाली घोषणा
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला


ब्रिटिशांच्या झेंडा ची प्रेरणा घेऊन
गांधीजीनी आंध्रप्रदेशचे क्रांतीकारी
श्री पिंगली वैंकैयाला दिले झेंडाची कल्पना
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला


माझे जन्मदाते
श्री पिंगली वैंकैयांनी केले
अनेक ५० विदेशी ध्वजाचे केले निरिक्षण
तिन रंगाचे, मध्ये २४ आट्याचे चक्र
२२ जुलै १९४७ रोजी
संविधान सभेत, राष्ट्र ध्वज म्हणून मान्यता
डॉ राजेंद्र प्रसादांनी केली घोषणा
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला


केशरी रंग, शक्ती- शौर्याचे
पांढरा रंग, सत्य- शांतीचा
हिरवा रंग, कृषी- सौंदर्याचा
आणि सम्राट अशोक चक्र, निळा रंग प्रगतीचा
धर्मनिरपेक्षाचे राष्ट्रीय ध्वज निर्माण झाले
आणि चार रंगात माझा
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला


तेव्हा होता जोश
होते तेव्हा एकीचे बळ
नाही केले राजकारणी खेळ
रंगांच्या अर्थाचा झाला मेळ
आणि आजच्या दिवशी माझा जन्म झाला 


तसा आज मी झालो ७३ वर्षाचा
राष्ट्र अभिमानाचे- सन्मानाचे प्रतीक
मी सर्व धर्म- अनेक जातीचा एकच प्रतीक
शोभे भारतीयांना देशाचे स्वाभिमान
पण एक विनंती आहे__
फक्त १६ ऑगस्टला नी, २७ जानेवारीला जमीनीवर
नका करू कागद रुपी माझा अपमान
माझ्या बरोबर सैनिक- शेतकरी व महिलांचाही राखा अभिमान


सर्व भारतीयांना राष्ट्रीय ध्वज ७३व्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
राष्ट्र ध्वज चिरायू होवो हि, सदिच्छा !!


*जय जवान- जय किसान- जय विज्ञान !!*
            *जय भारत !!!*  🇮🇳


                   ~@विलास ह.ल. देवळेकर 🙏
                            आयकर भवन- मुंबई


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image