कोकणातील श्रावण महिना


विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक)


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे  बाल कवींची कवितेची आठवण झाल्यावर मन अगदी भारावून जाते  कारण याच महिन्यात  कोकीळ ताईचे गुण गुणारे मंजुळ स्वर  सकाळ सकाळ पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाटाने  मन प्रसन्नित होते   झाडा-झुडपांची  जुनी   पाने गळून झाडांना सर्व नवीन पालवी  फुटलेली असते. अर्थात आपली जुनी वस्त्रे काढून नवीन वस्त्रे परिधान केलेली असते  नदी,नाले,ओढे तुडुंब भरलेली असतात  डोंगरातून उंच वाहणारा धबधबा पाहून डोळे   व्यापून जातात याच महिन्यात बळी राजाची लावणीची कामे  पूर्ण झालेली असतात.  त्यामुळे सर्व पिके हिरवीगार दिसत असल्याने  खरोखर  निसर्गाचे रुप खुलून येते हिरव्यागार निसर्गाला रान


फुलांचा सुंदर साज चढू लागतो  निसर्गाने हिरवाईचा सुंदर शालू नसल्यावर या हंगामात  उगवणारी शेकडो रानफुले हिरव्यागार  निसर्गाला रानफुलांचा शिरपेच ठरतात म्हणजे धरतीमाता हिरवी साडी परिधान करून या हंगामाचा आस्वाद घेते. त्याच प्रमाणे शेतीची कामे उरकून सर्व शेतकरी  बांधव श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार नंतर  नागपंचमी नारळीपौर्णिमा,  रक्षा बंधन, गोपाळ काला  या सणांचा आस्वाद मनमुराद घेतात गुरंढोर या आनंदाला अपवाद ठरतात. कारण सगळीकडे हिरवळ दाट ल्यामुळे गुरं - ढोराना  मनमुराद खाण्यासाठी हिरवळ वाढत असते. त्याच बरोबर बळीराज्याचे  शेतीचेकाम पूर्ण झाल्या मुळे "बैल माझा गुणवान" म्हणजे बैलांचा पण खाण्याचा प्रश्नच निसर्ग सोडवितो. म्हणजे सृष्टीकर्त्याला किती प्रत्येक गोष्टीची जाण आहे. श्रावण महिन्याच्या सणांचा आस्वाद घेता घेता रान फुलांना सुद्धा बहर येतो तो कशा साठी याची कल्पना  केली तर भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपती सणासाठी ही फुलझाडे-झुडपे खास करून स्वागताची कमानी निर्माण करतात. कारण हे सर्व घडविणारा  रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचा दाता तो गजानन मायबाप आहे.  आणि त्याच्या इच्छेने हे झाडाचे पान हलते म्हणजे प्रत्येक जीवाला गणपती बाप्पाचं कृपाशिर्वाद  असल्याशिवाय तो जीव हलू शकनार नाही आणि झाडाचं पान सुद्धा हलणार नाही. अशा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हिरव्यागार झुडपातून प्रथम डोकावू लागतात ती गांधारीची फुले, नारंगी, तांबूस, गुलाबी रंगाची फुले एवढी बहरतात की, आठवड्यातून झाडाचे हिरवं अस्तित्व हिरावून घेतात. माळ रानावर  पसरलेली विविध रंगाची फुले पाहून निसर्गाच्या अद्भुत आविष्काराची कल्पना येते. त्याचप्रमाणे गवताला सुद्धा नाना प्रकारची फुले येतात.  जागोजागी गौरी मातेच्या स्वागतासाठी असणारी तेरड्याची फुले, त्याचप्रमाणे   सोनवेल या वेलीवर येणारी फुले पिवळसर रंगाची असल्या कारणाने त्याचे नाव सोनवेल दिले जाते.  अशी निसर्गाची देणगी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी वेळेचे भान ठेवून बाप्पांच्या अधेशान सृष्टीच्या निर्मिती पासून आजतागायत उभी आहे.  श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणामुळे कोकणात आनंदाला उधाण येते.  कोकणात नागपंचमीच्या सणापासून प्रत्येक गावातील मुले, मुली गौरी गणपतीच्या सणासाठी नाच-गाण्यासाठी उदा. झिम्मा, फुगडी, तसेच जाकडी न्रुत्याची तयारी करत असतात. तर जिकडे तिकडे  ढोल-सनई सजविण्यात पुरुष मंडळी सज्ज असतात. प्रत्येक गावकरी बऱ्याच गावांत आप आपल्या गावातील ग्राम देवतेच्या देवळात नारळी पौर्णिमा  (अर्थात जागर , ही साजरा केला जातो  म्हणजे  नारळी  पौर्णिमेच्या आदल्या दिवशी  रात्री  गावातील ग्राम देवतेच्या देवळात  पुरुष मंडळी  जागरण करतात.  कोकणात एक खास वैशिष्ट्य म्हणजे ग्राम देवतेच्या देवळातील दही हंडी फोडल्यावरच  बाळगोपाळ  गावातील हंडी फोडण्यासाठी  सुरवात  केली जाते. गोविंदा रे गोपाळा ,एकदोन तीनचार आमच्या गावातील पोरे हुशार, आला आलारे गोविंदा आला असे एक सुरात सूर मिळून गोविंदा आपल्या गावांतून साजरा केला  जातो. अशा तऱ्हेने हा सण साजरा झाल्यावर कोकणी माणूस गौरी गणपतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आतुरतेने वाट पहात असतो.  काही म्हणा कोकणात  श्रावण महिन्यात मात्र वेगळीच मजा असते हे नक्कीच!


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image