तप्त वासुधा ही होते शांत
कडक वणाव्याची तिलाही पडते भ्रांत
रखरखत्या ऊनानंतर मिळे गारवा
तिच्या नी त्याच्या प्रेमाचा तो करावा
पहिल्या पावसाचा तो सुखद सांगावा
पाऊस सरी...कधी वाटे रिपरिप कधी वाटे किरकिर
कधी वाटे चिखल, कधी भिजरी वाट
मातीचे तो शिंतोडे उडवी
तरीही खुलवी त्या चिखलातून कमळ
कधी बरसेल तो रिमझिम, कधी कोसळे अनावर
कधी सोबत असती कडाडणाऱ्या विझा
तरीही शेतकऱ्याच्या पिकाला जगवी
तो धर्मरक्षक, कर्तव्यदकक्ष निसर्गराजा
मोर लांडोर नाचती फुलवीत पिसारा
दरवळीत सुगंध प्राजक्ताचा बहरली ती वसुंधरा
इंद्रधनु हि दिसे नभी खुलवित नात्यातील हर एक रंग
श्रावणसरीच्या प्रत्येक थेंबातून मन ते ओथंबून जाई
हिरव्या चुडाने सजली वसुधा
डोंगर कपाडीवरील धबधबा घेईल कवेतच तिला
प्रेमाला त्या उधाण येईल
हळुवार स्पर्शाने मन मोहरुन जाई
करीत वर्षाव प्रेम आणि ओलाव्याचा वर्षा जाण्याची वेळ आली
रुजवित अंतरी रंग प्रेमाचे...
सोसण्या वार ऊन वाऱ्याचे धरती माय पुन्हा एकवार सज्ज झाली
धरती माय पुन्हा एकवार सज्ज झाली...
सोसाण्या वार ऊन वाऱ्याचे......
- सौं. पूजा तलाठी