रक्षा बंधन ..
नात्याचे हे बंधन
न कळे करोनाला
येणार नाही ताई
यंदा रक्षाबंधनाला
अंतर पडे भेटीत
वेदना होई मनाला
घास लागेना गोड
रंगत ना सणाला
टिळा कपाळाला
बदले रे भाग्याला
यंदा नाही आनंद
मला अ भाग्याला
निरांजने डोळ्यांची
नाही ओवाळायला
मनगट सुने सुने रे
नको वाटे पहायला
कोरोनालावी ग्रहण
का प्रत्येक सणाला
पाहु प्रश्नाचे उत्तर
मिळे लस कुणाला
-हेमंत मुसरीफ पुणे.
******
सागरा ..
नारळीपौर्णिमा सणां
पुजा करिते सागरा
रक्षा बंधन हे अद्रुश्य
तू भाऊ माझा खरा
नाथमाझा मच्छीमार
मेहुणा तुझाचं प्यारा
तुझ्यासारखा धाडसी
उत्साह त्यांचा न्यारा
भरती येता तुजला
सुटता वादळी वारा
नाव घेऊनि मोडकी
निघतो कसा भरारा
रत्नेमाणके तव पोटी
हाव ना आम्हां जरा
मछली मिळो ताजी
आधार दे गा संसारा
दादल्याला माझिया
पाठव सुखरुप घरां
कुंकू माझे तव हाती
विनंती तुला सागरा
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुभेच्छा.