विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक)
५ ऑगस्ट पासून मुबंई तील सर्व दुकाने चालू करण्याचा निर्णय मुबंई पालिकेने घेतल्या मुळे मुबंई तील आर्थिक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे कारण गेल्या मार्च महिन्यापासून मुंबईतील सर्व उद्योग धंदे बंद असल्याने करोडो रुपयांचे नुकसान दुकानदारांना सहन करावे लागले होते. त्या मुळे कामगार वर्ग ही बेकार झाला होता व सरकारची आर्थिक व्यवस्था ही डळमळीत झाली होती.
आता सर्व दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु दुकानातून काम करणारा कामगार वर्ग आपल्या गावाकडे गेल्या कारणाने व लोकल सेवा बंद असल्याने दुकानात
काम करणाऱ्या कामगारांची उणीव भासणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी पुनःश्च हरिओमची घोषणा केल्यानंतर मुबंईतील काही मोजकीच दुकाने आळी पाळीने चालू करण्यात आली होती परंतु कामगार वर्ग ,व गिऱ्हाईक नसल्या कारणाने दुकानदारांना पाहिजे तेवढा गिऱ्हाईक मिळत नव्हता. त्यातच मुंबईतील बहुतेक दुकानातून काम करणारा नोकर वर्ग हा कोकणातील असून विरार,नाला सोपारा, ठाणे कल्याण तसेच इतर उपनगरात राहणारा असून गेल्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन झाल्याने व उद्योगधंदे बंद असल्याने चाकरमानी वर्गाने आपल्या गावचा रस्ता धरला. परंतु आता मुबंईतील उद्योग धंदे चालू झालेत, पण खासगी नोकर दारांसाठी लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा नसल्याने आपण नोकरीवर कसे जायचे हा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.
त्यातच कोकणात प्रत्येकांच्या घरा- घरात गणपती बाप्पा येत असल्याने चाकरमानी वर्ग गौरी गणपतीचा सण आटपूनच मुंबईत येणार असल्याचे कळते. मुंबईत सर्व दुकाने चालू करण्याचा निर्णय झाला पण नोकरदार वर्ग नोकरीवर जाण्यासाठी प्रवास कशाने करणार. उपनगरातून बसेस सोडण्यात आल्यात पण उपनगरातून मुंबईत जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते व मुंबईत जाण्यासाठी तीन चार तास लागतात. चार - पाच महिने कामगार वर्ग घरी असल्याने सर्वांच्या घरची परिस्थिती अवस्था खूपच बिकट झाली आहे. काही नोकरदारांच्या आता नोकऱ्याही जाण्याची भीती आहे. कारण धंद्यात मंदी असल्याने धनी मालकांना पगारही देणे आता अवघड होणार आहे.त्यातच नोकरदार गावी असल्याने व रेल्वे लोकलमध्ये खासगी प्रवाशांसाठी बंदी असल्याने नोकर वर्ग नोकरीवर जाईल कसा? त्या मुळे काही व्यापारी नवीन नोकर ठेवण्याची शक्यता आहे. कारण आजची परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकाला कामाची गरज आहे. कितीही पगारात काम करण्यास मागे पुढे पहाणार नाहीत ही आजची अवस्था आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांना आता चांगल्या पगाराची नोकरी मिळणे कठीण होणार आहे. जर सरकारने लवकरात लवकर खासगी प्रवाशांसाठी लोकल गाड्या चालू कराव्यात अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे सरकार कधी लोकल गाड्या चालू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.