बैलांचा सण पोळा - (कविता)

         
मृगात बरसतो पाऊस तेंव्हा शेतकरी आनंदतो
सर्जा राजाच्या मदतीने घाम गाळत मशागत करतो
काळे नभ कोसळता, पेरणी करतो 
हिरवे पिक शेतात डोलते चांदण्यातही पिक शेतात चकाकते
श्रावणाच्या सरीत पिक मोत्याचे डौलते 
उन सावल्यांच्या खेळात...
बळीराजाच्या डोळ्यात सपान कसे फुलते
नागपंचमीतल्या झुल्यावर, नव्या मेहेदीतली लेक तोंड पानाने रंगवते...
आई,बापाचे काळीज सुखाऊन जाते
राखी बांधून बहिण सासरी जाते
भावाच्या डोळ्यातुनी पाणी झिरपते
श्रावणाच्या अखेरीला गाव पिकानं मातते, आनंदाचं भरतं संबंध गावात दाटते...
श्रावण सरतो पाऊस पांगतो...
बैलांच्या लाडाची , "पोळा"सणाची पहाट उगावते
बळीराजा बैलांना घालतो आंघोळ तेंव्हा बैलांच्या गळ्यात वाजतात चंघाळ्या...!
शिंगाला बेगड,पायात तोडे,गळ्यात गोंडे ,अंगावर झूल
विविध रंगाने रंगवले जातात "बैल"
बैलासाठी बळीराजा उपवास करतो
गावच्या वेशीतुन मिरवल्यावर त्याची पुजा करून जेवतो
आज बैलांना असते नवीन वेसन आणि नवा कासरा
बैलाच्या दोन शिंगात आज शोभतात फुगे आणी आरसा...
आजच्या दीवशी बैलांना नसते काम असतो फक्त त्याचा लाड
आज तमाम शेतकरी आत्मचिंतन करतो...
शेतात कष्टाशिवाय  पर्याय नाही
सर्जा राजा शिवाय शेती नाही...!
श्रावणातला अखेरचा असतो सण पोळा...
म्हणूनच गावागावात रंगतो बैलांचा सोहळा...!
————————————
खेडेगावातील माझ्या... बळीराजासाठी ही कविता
————————————


              प्रा.राजा जगताप
                    उस्मानाबाद
——————————————


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image