*माझ्या स्वप्नात आला तिरंगा !!*                                 १५ ऑगस्ट २०२०

                     
                             
माझ्या स्वप्नात आला तिरंगा
माझ्याशी बोलू लागला तिरंगा ||धृ||


 घरात अपवादाने असे हेवेदावे
काहींच्या शेजाऱ्यांशी असे रुसवे फुगवे
पण माझ्यासाठी सर्वजण एकताने शत्रूंशी करे पंगा 
     माझ्या स्वप्नात....


आपल्या घरात एकमेकांशी करे आदर
आलेल्या पाहुण्यांशी करे अती आदर 
पण माझा वाढदिवस मिळून करे चंगा 
     माझ्या स्वप्नात....


घरात टिव्ही मुळे नसे कधी जेवणास नेम 
लॅपटॉप असे किंवा व्हाट्सअॅप  गेम 
पण स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाने सांस्कृतीक करे दंगा 
     माझ्या स्वप्नात.....


घराच्या हिस्यासाठी भांडण करी
जमिनीच्या जागेसाठी अबोला राही
पण माझ्या वीतभर जागेसाठी शत्रूला करे नंगा 
      माझ्या स्वप्नात....


प्रत्येक धर्माची- सणाची असे सुट्टी
माझ्या राष्ट्रीय सणाची हमखास असे सुट्टी 
पण आपण जातीभेद विसरून आपल्या छातीवर अभिमानी दिसे तिरंगा 
     माझ्या स्वप्नात....


माझ्या साठी जसं करता, तसं शेतकऱ्यांसाठी हि करा रे
अन्न- वीज- पाणी- कचऱ्याची  बचत करा रे 
पण त्याला पण जगवा तर समतोल दिसे निसर्गा 
      माझ्या स्वप्नात.....


सध्या जगावर आलंय कोरोनाचं संकट
तूम्ही खा पिया रहा दंणकट
पण माणुसकी सोडून नका, नका वागू बोलू वंगा
        माझ्या स्वप्नात....
धन्यवाद !! 🙏


                  ~@विलास देवळेकर
                       आयकर भवन-मुंबई


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image