खडसे ज्या पक्षात चालले  आहेत त्या पक्षात त्यांनी चांगलं काम करावं- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

               


कोल्हापूर  /लोकनिर्माण ( संजय नायर, अमोल कोळेकर)


      एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलताना खडसे कितीही रागावले तरी हा निर्णय घेणार नाही, याबाबत आम्ही सगळेच आशावादी होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच ठरलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, त्यामुळे एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य असल्याचंही ते म्हणाले.एकनाथ खडसेंना यांच्या निर्णयासाठी त्यांना शुभेच्छा देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, 'खडसेंनी पक्षात रहावं, त्यांनी आमचं नेतृत्त्व करावं हिच आमची इच्छा होती. त्यामुळे सातत्याने त्यासदंर्भात प्रयत्न झाले. पण सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही. ज्या पक्षात आता खडसे चालले आहेत. त्या पक्षात त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत. यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो!


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image