पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)
दौंड विधानसभा कार्यक्षेत्रातील आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दौंड तालुक्यात विविध भागा मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यवत येथे आ.राहुलदादा कुल युवा मंच व सुरेशभाऊ शेळके मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली टप्प्यातील घरगुती वापराच्या पिठ गिरण्यांचे पूजन करून ५०% सवलतीच्या दरात यवत पंचक्रोशीतील महिला भगिनींना घरगुती पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दोन अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली.
यावेळी मा.ग्रामपंचायत सदस्या शेंडगेताई, शितलताई शेळके, गणेश शेळके, गणेश दोरगे, प्रणित दोरगे, तुषार लाटकर, राजेंद्र दोरगे, चैतन्य ढवळे, वैभव भागवत, तुषार दोरगे, विजय कदम, रोहित बनसोडे, अजित भोसले, आबा दोरगे, प्रज्वल शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज चोरगे यांनी केले तर आभार अॅड. अजित दोरगे यांनी मानले. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजार करण्यात आलयाचे सांगण्यात आले.