मुंबई /लोकनिर्माण न्युज
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या अधिक वेगवान होणार आहेत.कमी भारमान तसेच तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देशभरातील १८ रेल्वे झोनकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार ज्या पॅसेंजर गाड्यांना मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे, त्यात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या रत्नागिरी - मडगाव (50101), मडगाव - रत्नागिरी (50102), दिवा - सावंतवाडी (50105) सावंतवाडी - दिवा (50106) या गाड्यांचा समावेश आहे.