जर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा झाले असतील तर ते परत घेतले जाणार आहेत. असे न केल्यास FIR दाखल केली जाणार!

 





 नवी दिल्ली/लोकनिर्माण न्युज 


       देशभरातील विविध ठिकाणी मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तमिळनाडू ते उत्तर प्रदेशमधील बाराबंकी आणि मिर्झापूर याठिकाणाहून मोठे घोटाळे समोर आले. दरम्यान ही प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारने काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी अपात्र असून देखील या योजनेतील पैशांचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील. असे न केल्यास सरकारी पैसे परत मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून संबंधित व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.


      गेल्या महिन्यातच असे समोर आले होते की, यूपीमधील बाराबंकी याठिकाणी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. अडीच लाख अपात्र नागरिकांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. प्रशासनाकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.




Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image