पाटपन्हाळे कोंडवाडी ते पिंपळवट आरे एस टी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर च्या वतीने निवेदन

गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर) 


      गुहागर विजापूर हया राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर येथील पुलावरून वाहतूक बंद झाल्याने व या नवीन पुलाचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही रानवी मार्गे वळवण्यात आली होती. यामुळे शृंगारतळी,पाटपन्हाळे कोंडवाडी, पिंपळवट आरे, गुहागर येथील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.


     पाटपन्हाळे कोंडवाडी हे गाव दुर्गम भागात असल्याने येथे वाहतुकीची सुविधा देखील नसल्याने येथील नागरिकांनी गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर ह्याच्याशी संपर्क साधत आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या विनंती ला सकारात्मक प्रतिसाद देत मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सोमवारी गुहागर डेपोचे आगारप्रमुख  वैभव कांबळे, पवार  ह्यांना  निवेदन देत  ग्रामस्थांच्या समस्यांचा पाढाच वाचला ह्यावर आगार प्रमुख यांनी सुद्धा सकारात्मतक प्रतिसाद देत दिनांक १३/१०/२० ह्या मार्गावर बस सेवा सुरू करू असे आश्वासन दिले.


     


    संपूर्ण महाराष्ट्रात कोणतेही प्रश्न असोत  ते प्रश्न सर्व महाराष्ट्र सैनिक पक्षाचे अध्यक्ष हिंदू जननायक मा. राजसाहेब ठाकरे मनसे ह्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने सोडवत आले आहेत आणि म्हणूनच आमची समस्या सुद्धा मनसेच मार्गी लावू शकते असा विश्वास आमच्या मनात होता आणि तो आज सार्थ ठरला असे म्हणत येथील ग्रामस्थांनी मनसेवर विश्वास व्यक्त केला. ह्यावेळी  उपतालुका अध्यक्ष धर्मराज कदम, महिला आघाडी विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, विभाग अध्यक्ष प्रमोद राऊत,मयूर शिगवण, गणेश डेरवणकर,सुयोग कुबंडे व आदि उपस्थित होते.


        


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image