राॅयल नांदेडच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी ऐश्वर्या कुंटे यांची निवड

                 
       
 मुंबई / लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे )


    ऐश्वर्या कुंटे यांनी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची,चार्मिंग स्टार ऑफ़ इंडिया, महाराष्ट्राची फेव्हरेट टिकटॉक स्टार हे असे शो जिंकल्यामुळे ऐश्वर्या कुंटे या सर्व घराघरात पोहचल्या. विविध शो जिंकल्यामुळे ऐश्वर्या कुंटे यांची रॉयल नांदेडच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी निवड करण्यात आली आहे.या ब्रँड अॅम्बेसिडर पदासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धक असतांनी सुद्धा रेणुका ठाणगे यांनी ऐश्वर्या कुंटे यांच्यावर विश्वास दाखवला. विशेषतः म्हणतात ना " सब्र का फल मीठा होता है " अगदी हे असेच ऐश्वर्याच्या बाबतीत घडले आहे.नांदेड सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या ऐश्वर्या कुंटे यांनी स्वत:च्या जिद्दीवर यशस्वी प्रवास केला अन नांदेडच्या ब्रँड अॅम्बेसिडरचा मुकुट पटकाविला.सर्व साधारण कूटुंबातील ऐश्वर्याने मेकअप आर्टीस्ट ते ब्रँड अॅम्बेसिडर असा प्रवास केला. त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांना पती रतन आझादे यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व ठिकाणी आई हीच मैलाचा दगड म्हणून उभी होती.तसेच वडील प्रा.राज कुंटे यांनी खंबीर पाठींबा दिल्यामुळे मी यशस्वी झाले असे ऐश्वर्या यांनी सांगितले.ब्रँड अॅम्बेसिडर रेणुका ठाणगे आणि आयोजक नितिन झगरे यांनी त्यांच्यावर नांदेडचा पदभार सोपविला आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.या निवडीचे पत्र लवकरच देण्यात येईल अशी माहिती सपोर्टिंग पार्टनर वर्षा ताई ढमढेरे यांनी दिली. रेणुका ठाणगे, युवाक्षी पाटील, जान्हवी पाटील, योगिता गोसावी मैडम, मयुरेश अभ्यंकर सर, नमिता पाटील, ज्योती लाड, तन्वीर सर, प्रचिती पुंडे, सुमैया पठाण यांनी ऐश्वर्याचे हार्दिक अभिनंदन केले आणि या क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image