मुंंबई/लोकनिर्माण न्युज
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती ट्विट करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत असल्याचं म्हणत महिलांच्या लोकल प्रवासांच्या विलंबाचा चेंडू रेल्वेमंत्र्यांनी ठाकरे सरकारकडे टोलवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा