उत्तर प्रदेश हाथरस  प्रकरणात न्याय व्हावा याकरीता सुरू झालेल्या जिजाऊ सावित्री बाग ,चे नवव्या दिवसाच्या आंदोलनात तोच उत्साह

 


कल्याण /लोकनिर्माण न्यूज(सौ राजश्री फुलपगार) 


     हाथरसची कन्या  व भारतातील तमाम बलात्कार हत्या, अत्याचारास बळी पडलेल्या  मुलीच्या महिलांच्या , न्याय ,सन्मान, समानता, आणि श्रध्दांजली करीता एकत्रित येणं गरजेचे आहे.आपण सातत्याने पाहतोय , सामूहिक बलात्कार, हत्या सत्र सुरू आहेत. मुली , महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेत. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत .मुली आणि महिलांची सुरक्षितता कशी होईल ? न्याय कसा मिळेल ? अशा घटना कशा थांबतील ? यासर्व प्रश्नांवर बोलले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे हा आवाज सर्व दूर शासन, प्रशासन यांच्या कानापर्यंत  गेला पाहिजे. या करीता सुरू झालेले आंदोलनाचा आजचा सातवा दिवस होता.
सहावा दिवसाची सर्वात संविधानाची प्रस्तावना एकत्रित वाचन करून झाली.   


    यावेळी प्रमुख वक्ते NCP चे महाराष्ट्राचे प्रवक्ते , महेश तपासे होते. त्यांनी अतिशय अभ्यास पूर्ण माहिती देत आपले विचार मांडले , स्त्री पुरुष समानता , घरातून आई वडिलांनी मुलांशी साधला पाहिजे प्रामुख्याने मुलांचे वडिलांचे प्रबोधन झाले पाहिजे.
     कायद्याने सर्व काही ठीक होईल असे नाही हे सांगताना , कायद्यात बदल होत होत ,निर्भया प्रकरणांतर आरोपींना फाशी झाली पण हे सत्र थांबले नाही असे ते म्हणाले.


आयोजकांतर्फे वर्षा कळके यांनी या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली तर शोभा ताई केदारे व नीलम व्यवहारे यांनी आंदोलन तेवत ठेवण्याचा निर्धार केला आहे.
उदय रसाळ यांनी प्रशासन व न्याय व्यवस्था चे पाईक असलेल्यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत असले पाहिजे हे सांगून हाथ रस सह अनेक प्रकरणांत जात धर्म , संबंध आणि भ्रष्टाचार यात गुरफ टून न्याय देण्यापासून जबाबदार व्यक्ती दूर जातात त्यामुळे ,आरोपींचे मनोबल वाढते यातूनच गुन्हेगार लोकांना भीती राहत नाही असे सांगत संबधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले.
आज या आंदोलनात प्रमुख उपस्थित राहिलेले , महाराष्ट्र चे ख्यातनाम सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.


         


      जिजाऊ सावित्री बागेच्या समन्वयक यांनी उपस्थितांचे आभार मानले सलग चालणाऱ्या या आंदोलनास संस्था संघटनांनी ,पाठीब्याचे पत्र देण्याचे आवाहन तसेच कल्याण तसेच इतर शहरातील महिला अत्याचार व मदती करीता काम करणाऱ्या संस्था ,व्यक्ती यांना एकत्रित जोडून काम करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.


*उदय रसाळ* (भारत बचाओ आंदोलन , महाराष्ट्र)
*स्मिता साळुंखे* ( भारत बचाओ आंदोलन , महाराष्ट्र संघटक  )
*वर्षाताई कळके* (अध्यक्ष  स्त्री मुक्ती संघटना कल्याण पूर्व)
*शेखर केदारे* (सामाजिक कार्यकर्ते कल्याण पूर्व)
*विजय मोरे* (सामाजिक कार्यकर्ते कल्याण पूर्व)
*शोभाताई केदारे* (सामाजिक कार्यकर्त्या कल्याण पूर्व)
*लालीताताई आखाडे* (सामाजिक कार्यकर्त्या कल्याण पूर्व)
*संजय निरभवणे* ( सर्वात्मका सामाजिक संस्था )
*सूनंदाताई पांचाळ*(सामाजिक कार्यकर्त्या कल्याण पूर्व)
*बागुल मैडम* (सामाजिक कार्यकर्त्या कल्याण ं
*अलका साळवे*( सामाजिक कार्यकर्त्या)
उपस्थित होते .


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image