गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर)
कोरोनाच्या कालावधीत गुहागर तालुक्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्यसेविका मीराबाई हुडे तसेच आशा सेविका सौ. अमृता जानवलकर यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे जानवळे ग्रामपंचायत मार्फत कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाला सभापती विभावरी मुळे, जिल्हापरिषद सदस्य प्रवीण ओक, उप सभापती सुनील पवार, उप संरपंच शुशांत शितप,डॉक्टर राजेंद्र पवार ,डॉक्टर मयुरी देसाई , सरपंच नम्रता संसारे व सदस्य , तसेच गावचे अध्यक्ष भरत शितप, उपाध्यक्ष दत्ताराम जांभळे, ज्येष्ठ नागरिक अर्जुन शितप, अंतिम संसारे, ग्रामसेवक जीबी सोनवणे, सुनील जाधव, सामाजिक कायकतै विजय जानवलकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.वैभवी जानवलकर,किशोर कुलकर्णी, सायली जाधव उपस्थित होते , तसेच कोव्हिड ४० पेक्षा जास्त कोव्हिड योध्दाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत संरपंच,सदस्य ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.