चिपळूणची ऐश्वर्या नागेश  आजपासून 'झी मराठी'वर झळकणार


चिपळूण/लोकनिर्माण(ओंकार रेळेकर)


         


       सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या 'देव माणूस' या मालिकेमध्ये  गुरुवार दि. ९पासून चिपळूणची सुकन्या, डीबीजे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या प्रकाश नागेश ही एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या नागेश हिने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धांमध्ये आजवर यश मिळवले आहे. एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश नागेश यांची ती कन्या आहे. सध्या ती एएलएसजी कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुरंगचा विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळविला होता. यापूर्वी तिने अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्ममधून अभिनय केला आहे. तसेच सह्याद्री वरील 'भ्रमंती महाराष्ट्राची या कार्यक्रमातही तिने निवेदन केले आहे. 'असंही घडू शकतं' हे नाटकही तिने केले असून आता ती 'देव माणूस' या मालिकेतून दिसणार आहे. ही मालिका रात्री १०.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image