पोलादपूर /लोकनिर्माण ( निळकंठ साने /शंकर शिंदे )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,यांच्या आदेशाने मंत्री अब्दुल सत्तार, यांनी केला कोकणात नुकसान भागाचा पाहणी दौरा केला. भातशेतीचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या भातशेतीच खुप नुकसान झाले आहे.
या दौर्याच्या वेळी आमदार गोगावले यांची उपस्थिती दिसुन न आल्या मुळे श्री सत्तार यांनी गोगावले यांची चौकशी केली त्या वेळी गोगावले यांची तब्बेत ठिक नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे समजताच श्री सत्तार साहेबाणी पुढील दौर्यास उशीर झाला तरी चालेल पन गोगावले यांना भेटुनच पुढील दौरा करण्यात येईलअश्या सहकार्याना सुचना दिल्या कारण सत्तार काँग्रेस पक्षात असल्यापासून गोगावले आणि सत्तार यांची मैत्री आहे.
आमदार गोगावले यांची त्याच्या शिवनेरी या निवासस्थानी त्यांच्या तबेतीची आपुलकीने विचारपुस करून चहापाण्याचा कार्यक्रम आटोपल्या नंतर जवळ जवळ एक तास मतदार संघातील विकास कामांसाठी लागणाऱ्या निधी संदर्भात तसेच पक्ष संघटना वाढवण्या संदर्भात दिलखुलास चर्चा करण्यात आली.
या वेळी गोगावले यांनी बंदर व खाडी लगत असलेल्या गावातील बंधारे व जेटी बांधणे,महाड येथे प्रशासकीय भवण,
महाड येथे न्यायालय बांधणे, NDRF साठी कायमस्वरूपी जागा , कायमस्वरूपी हॅलीपॅड, पोलादपुर येथे प्रशासकीय भवन, पोलादपुर येथे क्रिडा संकु या सोबतच अनेक कांमांची लेखी मागणी गोगावले यांनी मंत्री महोदयांकडे केली.
या वेळी मंत्री सत्तार यांनी मी महसुल-ग्रामविकास -बंदरे मंत्री असल्याने आपल्याला भरीव निधी देण्याची हमी दिली, भरतशेठ हे विधानसभेत विकास कामा बद्दल असो किंवा पक्षा विषयी एखादा विषय असो ते एखाद्या *फायटर* सारखे तो विषय लावून धरतात.म्हणूनच भरतशेठ यांना मी फायटर आमदार असेच बोलत असतो. कारण मी जरी विसरलो तरी भरतशेठ हे कार्यतत्पर आमदार आहेत त्यांना एखाद्या कामाला निधी देतो बोलो तर ते त्या कामाचा निधी मंजुर करून घेत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा सोडत नाहीत त्या मुळे गोगावले यांचा मला चांगलाच अनुभव आहे, असे मंत्री म्हणाले.
शेवटी जातांना मंत्री महोदयांनी आवर्जून गोगावले यांना तबेतीची काळजी घ्या आपण लवकरच बरे होऊन आमच्या जोडीला पुन्हा त्याच जोमाने काम करण्यासाठी याल अशी अपेक्षा करतो , या दौऱ्यात तुम्ही नसल्यामुळे तुमची खूपच उणीव भासत आहे, कारण रायगड मधील जनताआणि शिवसैनिक तुमच्यावर भरभरून प्रेम करत आहेत असे श्री सतार म्हणाले.
माननीय मंत्री यांचे गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी आगमन होताच जिल्हा परिषद सदस्या सौ. सुषमाताई गोगावले, यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले, त्या वेळी त्यांच्या समवेत आमदार महेंद्र शेठ दळवी,आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी गोगावले यांनी मंत्री महोदयांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी उपस्थित उप जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, विभाग प्रमुख, उप तालुका प्रमुख ,आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक🚩इत्यादी उपस्थित होते.