चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)
चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट वसंतराव लाड यांच्या बी.एल.एस. ऑडीट फर्मचा दुबई सरकारकडून सर्वोच्च बहुमानाने सन्मान करण्यात आला आहे. अलोरे गावच्या सुपुत्राने अटकेपार झेंडा रोवल्याने लाड यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
दुबई सरकारच्या सर्वोच्च १४ कंपन्यांमध्ये अग्रेसर ठरण्याचा बहुमान वसंतराव लाड यांच्या बी.एल.एस. ऑडीट फर्मने मिळवला आहे. आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून गरीब युवक ते नामांकित चार्टर्ड अकौंटंट, सीए फर्मचा मालक असा नेत्रदीपक प्रवास वसंतराव लाड यांनी केला आहे. गेल्या ४० वर्षात लाड यांनी दुबईतील आपल्या बी.एल.एस. ऑडीट फर्मचा नावलौकीक सातत्याने वाढविला आहे.