चिपळूण /लोकनिर्माण न्युज
तालुक्यातील आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे साठी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील गाव कलुस्ते खुर्द येथील मजलिसे शुभानुन मुस्लिमीन संस्था यांचे वतीने संस्थेचे संस्थापक व सर्वेसर्वा चिपळूण येथील प्रतिष्ठित परकार कॉम्प्लेक्स चे मालक श्री. खालिदशेठ परकार यांनी त्यांचे सहकारी सलीम परकार आणि सहकारी यांचे समवेत येऊन आरोग्य केंद्राला अकरा हजार पाचशे रुपये किमतीचा कलर प्रिंटर भेट दिला.
त्यानंतर खालिदशेठ परमार्थ यांनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत परिसरात फिरून पाहणी केली व एकूण स्वच्छता व शुशोभिकरण पाहून समाधान व्यक्त केले. सुंदर व प्रशस्त इमारती सह असलेले आरोग्य केंद्र पाहून त्यांना हेवा वाटला या वेळी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. निवेंडकर यांनी सर्वांचे प्रथम आरोग्य केंद्रात स्वागत केले आणि आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ अदिती बागकर यांनी शाल श्रीफळ फुलांचा बुके देऊन त्यांचा सत्कार केला या सर्वामुळे आम्ही भारावून गेल्याची प्रतिक्रिया श्री खालिद शेट परकार जाताजाता बोलून गेले. ही देणगी मिळविण्यासाठी आरोग्य सहाय्यक श्री. निवेंडकर व आरोग्य सेवक श्री. चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. या वेळी आरोग्य सहाय्यक स्त्री श्रीमती कवठणकर, श्री. जंगम व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.