गुहागर /लोकनिर्माण (सुनील जठार)
राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कडून सर्व सरकारी विभागांना स्थानिक पातळीवरील व्यवहार हे स्थानिक भाषेत व्हावेत मात्र असे असताना देखील हेदवी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मात्र हिंदी भाषेमध्ये व्यवहार होत असलेले निदर्शनात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने *राज्य सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, व जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. अनिलजी खानविलकर* ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व *तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर* ह्यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन दिले. राज्यात दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेमध्ये व्हावेत असे निर्देश आहेत तसेच बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र च प्रतिनिधित्व करत असली तरी हिंदी तसेच इंग्रजी चा प्रामुख्याने व्यवहार होत होता. येथील नागरिकांनी मनसे कडे निवेदन देत ह्यावर ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. त्यानुसारच तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी शाखा व्यवस्थापकांची भेट घेत बँकेचे सगळे व्यवहार मराठी मध्ये व्हावेत व कर्मचाऱ्यानी देखील मराठी भाषेचा प्रामुख्याने वापर करावा अन्यथा आपल्याला मनसे स्टाईल ने इंगा दाखवावा लागेल असा इशारा देखील दिला.
यावेळी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष विनायक दनदने, तालुका उपाध्यक्ष (पाट पन्हाळे जि.प गट) धर्मराज कदम, तालुका उपाध्यक्ष,जि.प.गड तवसाल उप तालुका अध्यक्ष विराज सुर्वे ,विभाग अध्यक्ष मयुरी शिगवन, शाखाध्यक्ष कौस्तुभ कोपरकर, संदीप आंबेकर अभिशेक जालगावकर * व आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.