ओबीसींची संघर्ष वारी,आमदारांच्या दारी मोहिमेअंतर्गत मुलुंड विभागाचे आमदार मिहीर कोटेच्या यांना निवेदन सादर .


मुलुंड /लोकनिर्माण(विशाल मोरे / शिवकन्या नम्रता शिरकर )


  - ओबीसी संघर्ष समन्वय समिती आणि व्हिजेएनटि मार्फत राज्यातील २८८ विधानसभा सदस्य व ६६ विधान परिषद सदस्यांना होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना तसेच ओबीसी समाजाचे असंख्य प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत आणि विधानपरिषदेत ओबीसींची प्रामुख्याने बाजू मांडण्याकरीता गुरुवार दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील सर्व आमदारांच्या कार्यालयावर तसेच घराबाहेर निवेदन देण्याकरिता ओबीसी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     
सदर निवेदनातील तपशील वाचून ओबीसींची निवडक प्रतिनिधी समवेत सकारात्मक चर्चा करुन आगामी विधानसभेच्या अधिवेशनात तांत्रिक बाबींना अधिन राहून ओबीसींची बाजू नक्कीच लावून धरु असे मा.आमदार मिहीर कोटेच्या यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.
ओबीसींच्या असंख्य मागण्यांबाबत शिवाय आगामी वाटचालीसंदर्भात विनायक घाणेकर यांनी उपस्थितीतांना माहिती दिली. समाजातील बंधू भगिनींनी या संविधानिक लढ्यास आतातरी सहभागी व्हावे असे आवाहन नरेश घरटकर यांनी केले. जातिनिहाय जनगणना झाली तर ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक बाजू अधिक सक्षम होईल असे मत विशाल मोरे यांनी व्यक्त केले. मोहिमेत सहभागी झालेल्या महिला प्रतिनिधी स्मिता भागणे यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी मुलुंड कुणबी समाजाचे अध्यक्ष विनायक घाणेकर, कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभागाचे सरचिटणीस नरेश घरटकर, युवाध्यक्ष विशाल मोरे,पांडुरंग गावडे,शंकर बाईत,विनायक मांडवकर,सुनील मांजरेकर,जिगर पाटील,अशोक पानकर, मनेश मोरे,सुलक्षणा घाणेकर, संजिवनी भुवड,स्मिता भागणे,विनोद टेमकर,रविंद्र मांडवकर,चंद्रकांत घडशी, चेतन मांडवकर, हरेश घावट,बबन रहाटे आदी ओबीसी प्रतिनिधी उपस्थित होते.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image