रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)
आपण सेल टॅक्स ऑफिसर आहे आपण तुमच्या मुलीला सेल टॅक्स ऑफीस ला नोकरीला लावतो असे सांगून रत्नागिरी येथील फिर्यादी अशोक नाचणकर यांच्याकडून चार लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. तुमच्या मुलीला सेल टॅक्स ऑफीस मध्ये नोकरी लावण्याचेआमिष दाखवून प्रौढाची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणुकीची ही घटना१२ जानेवारी ते ४मार्च २०२० रोजी घडली आहे.
विठ्ठल रामचंद्र पोवार आणि भारती ज्ञानदेव पाटील
(दोन्ही रा. शंखेश्वर मधुबन बिल्डिंग, रत्नागिरी ) अशी
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावेआहेत. त्यांच्या विरोधात अशोक विठ्ठल नाचणकर (,रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रारदिली आहे. त्यानुसार, विठ्ठल पोवारने अशोक नाचणकर यांना आपल्याकडील बनावट ओळखपत्रदाखवून मी सेल्सटॅक्स ऑफिसर असल्याचे सांगततुमच्या मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी विठ्ठल पोवार, आणि भारती पाटील यादोघांनी संगनमताने रोख २ लाख २ हजार घेतले.त्यानंतर पोवारने आपल्या बँक खात्यात १ लाख ३९ हजार तर भारती पाटीलने आपल्या बँक खात्यावर नाचणकर यांच्याकडून ४९ हजार रुपये स्वीकारले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.