खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
खेड तालुक्यातून दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी मनाचे मानबिंदु, हिंदूधर्म रक्षक , हिंदु जननायक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेड शहरातील प्रभाग क्र.४ मधिल तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी सिद्धेश गुजर, प्रथमेश गुजर ,सतिश पांचाळ, सुमित म्हापरलकर, आकाश जाधव, अजिंक्य खेडेकर, आदित्य खेडेकर, समीर बुथकर, राहुल बनसोडे ,संदिप बनसोडे ,संदिप खेडेकर स्वप्नील खोपकर, सुनील खेडेकर, भाऊ नांदगावकर, गणेश खेडेकर, प्रशांत उपावले, सुशांत खेडेकर, अक्षय खेडेकर, विशाल खेडेकर, विकास नांदगावकर आदीनी प्रवेश केला.