देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन देऊन देखील दुर्लक्ष केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली.बुधवारी अचानक तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार घोषणाबाजी करत थेट खड्ड्यात झाडे लावण्यास सुरुवात केली. कामथे, कोंडमळा, सावर्डे, आगवे, वहाळ फाटा, खेरशेत येथे महामार्गावरील खड्ड्यात झाडे लावून संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या नावाने शिमगा करत बोंबाबोंब आंदोलनाचा पहिला अंक आज शिवसैनिकांनी सादर करत प्रशासनाला चोख इशारा दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण परशुराम ते आरवली खेरशेत या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून पूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे दररोज अपघात होत आहेत.हे खड्डे तात्काळ भरण्याची आणि रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग आणि ठेकेदार कंपनीकडे केली होती.तसेच बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार कंपनीने संदीप सावंत यांच्या बरोबर बैठक घेऊन खड्डे भरून रस्ता डांबरीकरणाने ओव्हरलॅप करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
लेखी आश्वासन देऊन देखील सतत दुर्लक्ष केले जात होते.त्यामुळे बोंबाबोंब आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महामार्गावर झाडे लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता.त्याची देखील योग्य ती दखल घेतली नाही उलट पत्रव्यवहार करून आंदोलन थांबवण्याची विनंती करण्यात आली होती.दिवाळीच्या तोंडावर महामार्ग खड्डयांनी भरलेला असताना प्रशासन आणि ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने अखेर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट महामार्गावर उतरले.
बुधवारी सकाळी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकप्रमुख संभाजी खेडेकर,विभागप्रमुख रामभाऊ डीगे, युवासेना उप तालुकाप्रमुख संजय चांदे,मंदार निर्मळ,रवी डीगे,कापसाळ सरपंच सुनील गोरीवले,नाना महाडीक,संतोष ,विभाग प्रमुख रूपेशजी घाग (सरपंच दहिवली),विभाग प्रमुख श्री.संदिप राणे, उपविभाग प्रमुख श्री.प्रदिप चव्हाण, युवासेना उप तालुकाप्रमुख सागर सावंत, मुतॆवडे उपविभाग प्रमुख विजय नेवरेकर ,विर शाखाप्रमुख विजय बेंडल, वहाळ शाखाप्रमुख शांताराम कुंभार, मुतॆवडे शाखाप्रमुख अनिल गुरव, श्री.माऊली चव्हाण, विर उपशाखाप्रमुख रमेश दुगौळी श्री.विवेक सुर्वे, महिला शाखा संघटक सौ.मिनाक्षी जयस्वाल, उपशाखा प्रमुख श्री सचिन निगडे, श्री.दिपक चव्हाण, श्री. उमेश पवार, श्री.नयन कुळे श्री. संतोष गुरव, श्री.सनी जयस्वाल, विष्णू चव्हाण, रविंद्र चव्हाण, श्री. भुपेश सावर्ङेकर, प्रितेश चव्हाण, अशोक चव्हाण आणि असंख्य शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. महाडिक,उमेश खेडेकर,नरेश कांबळी,संजय डीगे,वासुदेव खेडेकर असे असंख्य शिवसैनिक कामथे येथील ठेकेदार कंपनीच्या कार्यालयासमोर महामार्गावर उतरले आणि प्रशासन तसेच ठेकेदार कंपनीच्या नावाने अक्षरशः बोंबाबोंब करण्यास सुरुवात केली.
शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. कामथे, कापसाळ, कोंडमळा, आगवे,सावर्डे,आणि वहाळफाटा, अशा ठिकाणी शिवसैनिकांनी थेट खड्ड्यात झाडे लावण्यास सुरुवात करून चिपळूण ते खेरशेत पर्यंत बोंबाबोंब करत झाडे लावून प्रशासन आणि ठेकेदाराचा निषेध नोंदवल्यानंतर प्रवाशांना त्रास नको म्हणून शिवसैनिक माघारी फिरले.मात्र बोंबाबोंब आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच ठेवणार असल्याचा इशारा संदीप सावंत यांनी यावेळी दिला आहे.