राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)
लांजा तालुक्यातील लांजा साठवली रोडवर रुण फाटा येथे एका पोत्यात खवले मांजराची खवले बाळगल्या प्रकरणी आरोपी जितेंद्र चव्हाण राहणार साठवली लांजा याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याचे कडील दोन लाख ६८ हजार रुपयाची खवले जप्त केली आहेत. आरोपी जितेंद्र हा खवले मांजराची खवले विक्रीसाठी घेऊन त्याची तस्करी करण्याच्या हेतूने जात असताना पोलिसांनी त्याला पकडले व त्याच्याकडून पोत्यात भरलेली खवले मांजराची खवले ताब्यात घेऊन जप्त केली व त्याला अटक केली.