देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)
लायन्स क्लब ऑफ देवरूखतर्फे अवयवदान, नेत्रदान, देहदानाबाबत कायमस्वरूपी व्यापक जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबतचे अर्ज भरून शुक्रवारी मोहिमेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
जागतिक अवयवदान दिनानिमित्ताने देवरूख पंचायत समिती कार्यालयात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायाभोळे, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. दारोकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, डॉ. कुलकर्णी यांनी एक तासाच्या कार्यक्रमात मोहिमेसंदर्भात राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.