आमदार विश्वनाथदादा भोईर यांच्या शुभहस्ते सिनेमा गृह ते वाशी नवी मुंबई बससेवेचे उद्घाटन


कल्याण / लोक निर्माण(सौ राजश्री फुलपगार) 
 
     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिवहन समिती सभापती मा. श्री मनोज चौधरी व मा. श्री शरद पाटील सहसंपर्क प्रमुख आणि स्थानिक शाखा प्रमुख सुर्यकांत सोनावणे यांच्या प्रयत्नाने श्रीराम सिनेमा गृह ते वाशी नवी मुंबई बससेवा सुरू करण्यात आली आहे.


         


     शुक्रवार ६/११/२० रोजी सकाळी १०-०० वाजता कल्याण शहरप्रमुख आमदार  श्री विश्वनाथदादा भोईर यांच्या शुभहस्ते बससेवा उद्घाटन सोहळा संपन्न  झाला. या प्रसंगी परिवहन सभापती श्री. मनोज चौधरी, सदस्य श्री. बाळा पिंगळे साहेब  शिवसेना नगरसेवक  मा.श्री. धनंजय बोडारे आबासाहेब मा.श्री. अप्पा पावशे, मा. श्री. महेश गायकवाड, श्री.पुरुषोत्तम चौहान, श्री. महादेव रायभोळे, श्री.सतीश जाधव, श्री. शरद पावशे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. श्री. जानू वाघमारे,  श्री. देवबा सुर्यवंशी, श्री. विनोद राऊत तसेच माजी उपमहापौर श्री. उमेश म्हात्रे,  श्री. हर्षवर्धन पालांडे,  तसेच महिला आघाडीच्या सौ मीनाताई माळवे, सौ पटवडे, सौ पवार , जिवा जैन शिवसेना कल्याण उल्हासनगर चे  विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख,शाखा प्रमुख,युवासेनेचे श्री. संतोष सावंत ,कु. तेजस  तसेच शिवशक्ती भीमशक्ती चे कार्यकर्ते व  शिवसैनिक, युवासेना,महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्व सहसंपर्क प्रमुख मा.श्री.शरद पाटील  व स्थानिक शाखा प्रमुख श्री. सुर्यकांत सोनावणे यांनी केले.
(या बस रोज सकाळी श्री राम सिनेमा ते वाशी ही बस ८.१५ ला सुटेल व संध्याकाळी वाशी वरून ५.४५ ला सुटेल.)


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image