रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नुकतीच राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली .या भेटीत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच वीजबिल विरोधी आंदोलन व इतर स्थानिक समस्यांबाबत चर्चा करून राज ठाकरे यांचे मार्गदर्शन घेतले.
लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल विरोधात मनसेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात आले .रत्नागिरीतही मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यावतीने दिवेबन्द आंदोलन , विजबिलांची होळी तसेच आमरण उपोषण अशी आंदोलने छेडण्यात आली होती.
या भेटीत रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच विविध विषयांवर राज ठाकरे यांचेकडून मार्गदर्शन घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत , राज ठाकरे यांचे स्वीय सहायक सचिन मोरे तसेच संजय धामनाक आदी उपस्थित होते.