रिक्षा संघटना ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा प्रवासी सोयी सुविधा मोबाईल अॅप लाँच करणार

 



कल्याण / लोकनिर्माण न्यूज(सौ.राजश्री फुलपगार)


    ओला,उबर, अॅप मध्ये सहभागी असलेले अनेक रिक्षा चालंकानी रिक्षा संघटनेचे ओला उबर च्या धर्तीवर प्रवासी मोबाईल अॅप विकासित करावे अशी मागणी अध्यक्ष तथा सभागूह नेता कल्याण डोबिंवली महापालिका यांचे कडे रिक्षा चालकांनी केली होती .


     


 या संदर्भात मोरया हाॅल बैलबाजार येथे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते रिक्षा चालक यांची बैठक संपन्न झाली . 
आय टी क्षेञातील तज्ञ यांचे कडुन प्रोजेक्टर व्दारे मोबाईल अॅप चे स्वरुप या बाबत ध्वनीफीत सादर केली . 
ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा प्रवाशी नागरिक महिला प्रवासी सुरक्षितता, सोयी सुविधा याची समाविष्टता अॅप मध्ये करण्या बाबत चर्चा करण्यात आली .
प्रकाश पेणकर यांचे संकल्पनेतुन अत्याधुनिक स्वरुपाचे रिक्षा संघटनेचे स्वदेशी रिक्षा प्रवास मोबाईल  अॅप लवकरच प्रवाशाच्यां सेवेत दाखल होणार आहे .
अॅपचे सेवा संचलन रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन करणार आहे.


     
     सदर बैठकिस सुबल डे, जितेद्रं पवार, संतोष नवले, शेखर जोशी, काका मढवी, तनवीर देसाई, नुर जमादार, रवि पावशे  विजय डफळ,  बंडु वाडेकर ,बापु चतुर , धिरज दुर्गडे , संजय बागवे,राजु लिबंड, अंबादास चौधरी, विलास भोईर, जगननाथ  भागडे, गणेश पवार, विश्वनाथ साठे, भुवल मिश्रा, विशाल म्हाञे, संदिप म्हाञे, दयानंद दळवी, संदानंद बळे, दिपक परब, इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image