देवरुख /लोकनिर्माण(संदीप गुडेकर)
गेली अडीच वर्षे बंद असेली देवरुख एस्.टी. आगारातील एस.टी. पार्सल सेवा अडीच वर्षाच्या कालावधीनंतर गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०२० पासून पून्हा जनतेच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात गूणिना कमर्शियल प्रा. लि.मुंबई यांच्या माध्यमातून एस.टी. पार्सल सेवा पुरविली जाते. त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवरुख येथील प्रशांत काबदुले ५ नोव्हेंबर पासून देवरुख डेपोची पार्सल सेवा सुरु करीत आहे.
व्यापार्यांच्या व जनतेच्या पसंतीला उतरलेली, जलद व स्वस्त पार्सल सेवा म्हणून एस टी पार्सल सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा अडीच वर्षे बंद असल्याने देवरुखवासियांची खुपच अडचण झाली होती.
या सेवेचा शुभारंभ देवरुखच्या नगराध्यक्षा मा. सौ. मृणाल शेट्ये यांच्या हस्ते व आगार व्यवस्थापिका मा. सौ. जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा श्री गुरुप्रसाद उर्फ बाबा सावंत,आयडीबीआय बॅकेचे देवरुख शाखा व्यवस्थापक मा श्री रोहन जाधव व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री युयुत्सू आर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक ५ नोव्हेबर २०२० रोजी सकाळी ११ वा. होणार असून या शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यापारी व जनतेने अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन गुणिना कमर्शिअल प्रा. लि. मुंबई यांचे देवरुख प्रतिनिधी प्रशांत काबदुले व सौ समृध्दी प्रशांत काबदूले यांनी केले आहे.