सभापती धनश्री शिंदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील सीआरपी महिलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी


चिपळूण/लोकनिर्माण (संदिप गुडेकर )


      तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्ती ( सीआर पी) महिला यांना मार्च पासून मानधन मिळाले नव्हते. याबाबत त्यांनी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे यांना निवेदन दिले होते. तात्काळ सभापती यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याशी संपर्क साधून सीआरपी महिलांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे रखडलेले मानधन मिळाल्याने सीआरपी म्हणून काम करणाऱ्या महिलांची दिवाळी गोड झाली. 


         
      तालुक्यात बचतगटाचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सर्व बचतगटांना समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजेच सीआरपी महिलांकडून  मार्गदर्शन केले जाते. यासाठी सुमारे २०० सीआरपी महिला तालुक्यात कार्यरत आहेत. मात्र, मार्च पासून या माहिलांना मानधन मिळाले नसल्याने संसार चालवताना त्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवाळीपूर्वी या सीआरपी महिलांनी आपली व्यथा सभापती धनश्री शिंदे यांच्याकडे निवेदनातून मांडली.  तात्काळ या घटनेची दखल घेत सभापती  धनश्री शिंदे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या जवळ प्रत्यक्ष चर्चा करून महिलांचा हा प्रश्न  मांडला. त्यांना दिवाळी आधी मानधन मिळावे याबाबत चर्चा केली. त्यानुसार तालुक्यातील सीआरपी महिलांना मार्च ते ऑगस्ट पर्यंत मानधन मिळाले आहे. या महिलांचा महत्वपूर्ण प्रश्न सभापती यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे या महिलांची दिवाळी  गोड झाली आहे. सर्व सीआरपी महिलांनी सभापती यांचे आभार मानले आहेत.


Popular posts
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image