रायगड /लोकनिर्माण न्युज
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपा व राज्य सरकारमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपा नेते व केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
"महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही. ही घटना आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देत आहे, त्या दिवसांमध्ये माध्यमांना अशाप्रकारची वागणूक दिली जात होती." असं प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केलं आहे.