गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर)
शृंगारतळी- गुहागर मार्गावरील मोडाकाआगर पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने हा मार्ग पूर्णतः बंद झाल्याने गुहागरकडे जाणारी सर्व वाहने पालपेणे- पवारसाखरी - रानवीमार्गे गुहागरला जात येत होती. मात्र, प्रवाशांची ही फरफट पाहून वरवेली ग्रामस्थांनी आता स्वतः खर्च करून दूर केली आहे. या ग्रामस्थांनी पाटपन्हाळे -वरवेली हा रस्ता तयार केला असून त्यामुळे प्रवाशांचे १० कि. मी. अंतर कमी झाले आहे.