रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)
गेल्या तीन महिन्यातील वेतन आणि आर्थिक संकटाला कंटाळून जळगाव आणि रत्नागिरी डेपोच्या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांची होरपळ होऊ नये यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पुढाकार घेऊन, मृतक एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या आदेशान्वये आर्थिक मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान एसटी कामगार सेनेच्या विभागीय पदाधिकार्यांनी मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली. तसेच याप्रसंगी शोकसभेत आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करून, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपयाची मदत केली.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पुढाकार घेऊन, मृतक एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक केली मदत