सांगली /लोकनिर्माण न्युज
दीपावली हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. यासाठी तेलावरची पणती, दिवे वा विद्युत माळांची रोषणाई करण्याची सर्वत्र परंपरा आहे. यामध्ये सौरऊर्जेवर तेवणाऱ्या दिव्यांची भर पडणार आहे. इचलकरंजीतील 'डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी असे दिवे बनवले असून यंदाच्या दिवाळीचे ते आकर्षण ठरले आहे.
इचलकरंजी येथील 'डीकेटीई' शिक्षण संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांंनी 'दिवाळी २०२० सोलारवाली' असा एक अनोखा संशोधनात्मक प्रकल्प राबवला आहेउपक्रमात त्यांनी सौरऊर्जेवर चालणारे दिवे (पणत्या) तयार केले आहेत. या दिव्यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते हुबेहुब पारंपरिक पणत्यांसारखे आहेत. ३ ते ४ तास सौर ऊर्जेमध्ये 'चार्जिग' केल्यावर हे दिवे ८ ते १० तास प्रज्वलित होतात. या दिव्यांना तेल,वात किंवा विजेची गरज नसल्यामुळे वापरकर्त्यांंची आर्थिक बचत होणार आहे. तसेच ते वापरण्यासही सोपे आहेत. या दिव्यांची गुणवत्ता उत्तम प्रकारची असून ते दीर्घकाळ टिकण्यास सक्षम आहेत.