देवरुख /लोकनिर्माण (प्रमोद हर्डीकर)
पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन देवरुख खालची आळी येथे नटराजपुजन करुन साजरा होत असतो.गेली ९३ वर्ष ही परंपरा सुरु असुन यंदा ९४ वे वर्ष आहे.अजित सावंत यांचे ओटीवर हनुमंतांचे स्थान आहे या ठिकाणी श्रीफळ ठेवून विधिवत नटराज पुजन करुन ही परंपरा कायम राखली गेली आहे.
खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालनिञ समाज या संस्थेची निर्मितीही याच उद्देशाने त्या काळी झाली.सावंत,रेवणे ,खवळे,मिशाळे व अन्य कुंटुबातील मंडळीनी एकञ येवून भजन,नाटक,या माध्यमातुन आपली कला जोपासली.डिसेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार धरुन सत्यनारायण पुजा व तीनअंकी नाटक सादर करण्याची परंपरा गेली ९३ वर्ष जोपासली जात आहे.
अजित सावंत यांचे ओटीवर नटराज पुजन करायचे व डिसेंबरात होणार्या नाटकाचा शुभारंभ तेथेच करायचा व कलाकार निवड करुन सरावही तेथेच व्हायचा.सध्या मकरंद रेवणे अध्यक्ष असुन पाच तारखेला नटराज पुजन होणार आहे.
गेली ९३ वर्ष ही परंपरा आजची पिढी तेवढ्याच ताकदीने पुढे नेत आहे हे विशेष आहे.येथील रंगमंचाने अनेक कलाकार घडवले आहेत.लेखक,दिग्दर्शक,तंञज्ञ यामुळे तयार झाले आहेत.पारावरचे नाटकहे कोकणातले प्रसिद्घ नाटक मानले जाते. भजन परंपरा व नाटक या माध्यमातुन खालची आळी परीसरातील ही समृद्ध परंपरा आजही टिकुन आहे.शंभरावे वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याचा मानस व्यक्त करुन त्या दृष्टीने तयारीही सुरु झाली आहे.