देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर )
चिपळूण येथील रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामाला बुधवारी मुंबई-पुणे प्रदेश विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांनी भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी शिवाजी नगर बस स्थानक चिपळूणच्या समस्यांबाबत नगरसेवक शशिकांत मोदी यांनी त्यांची भेट घेवून माहिती दिली. दरम्यान शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या आंदोलनामुळे बस स्थानकाच्या रखडलेल्या कामाला गती मिळाली असुन यापुढे दर्जेदार कामावर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
चिपळूण येथील रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामाला मुंबई-पुणे प्रदेश विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांची भेट