दापोली /लोकनिर्माण (विशाल मोरे )
तालुक्यातील दाभीळ मोरेवाडी येथील सद्गुरु क्रिकेट क्लब संघाने आज नव्या पर्वाला प्रारंभ केला असून क्रिकेटवीरांमध्ये जणू काही आनंदी वातावरण आहे. क्रिकेटला भारतीय युवकांचा श्वास आणि प्राण समजला जातो. क्रिकेट हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि म्हणून क्रिकटचा चाहतावर्ग दिवसागणिक वाढत आहे. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गल्लीतील खेळापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सद्गुरु क्रिकेट क्लब दाभीळ मोरेवाडी संघाने देखील आज रविवार,दि.८ नोव्हेंबर २०२० ठाणे,कळवा पठणी मैदान येथे मान्यवर व मुख्य क्रिकेट कमिटि तसेच क्रिडाप्रेमींच्या उपस्थितीत आपल्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.
सद्गुरु क्रिकेट क्लब हा पंचक्रोशीतील एक नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातो. नव्या पर्वासाठी
पंचक्रोशीतून अनेक मान्यवरांनी संघास अभिनंदनासह सदिच्छा दिल्या आहेत.