चिपळूण/लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)
चिपळूण शहरातील कावीळतळी येथे सौ.गौरी शिंदे आणि सौ.नेहा शिंदे यांच्या सहेली लेडीज गारमेन्ट्स अँड टेलरिंग या नव्या शॉपचे उदघाटन नुकतेच थाटात पार पडले.
कावीळतळी येथे बैंक ऑफ़ इंडिया शाखेच्या पुढे महिला वर्गासाठी हे खास दालन सुरु झाले आहे. याठिकाणीआकर्षक ड्रेस मटेरियल,कुर्ती,लेगिंस,प्लाझो,अंडरगारमेन्ट्स,तसेच सर्व प्रकारचे कोस्मेटीक्स,योग्य दरात उपलब्ध आहे. तसेच इमिटेशन ज्वेलरी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. सौ.सुलभा शिंदे यांच्या हस्ते या शॉपचे उद्घघाटन झाले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख वैशाली शिंदे, सभापती सौ.धनश्री शिंदे, माजी सभापती सौ.पुजा निकम, राणी महाडिक, पं.स.सदस्य सुनिल तटकरे, सौ.रिया कांबळे,नगरसेवक मनोज शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विकी नरळकर,आरोग्य अधिकारी सौ.ज्योती यादव, जि.प.सदस्या सौ.दिप्ती महाडिक, पं.स.सदस्या सौ.रुतुजा पवार, सौ.गौरी आयरे,यानी शॉपला सदिच्छा भेट दिली.पं.स. सदस्य राकेश शिंदे यानी सर्वांचे स्वागत केले.