चिपळूण /लोकनिर्माण (संतोष तांबे)
प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीचे आरोग्य सहाय्यक श्री. परशुराम तुकाराम निवेंडकर याना नुकताच मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याने जि.प.सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरीच्या वतीने संस्थेचे चेअरमन श्री. सिनकर व व्हा.चेअरमन श्रीम. पवार यांचे हस्ते सर्व संचालक यांचे वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यापूर्वी आरोग्य केंद्राचे ठिकाणी रुग्ण कल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे यांच्या वतीने ही या पूर्वी त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि प सदस्या सौ मिनल काणेकर, पंचायत समिती सदस्य तथा चिपळूण पंचायत समिती उप सभापती श्री. पांडुरंग माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलापुरकर मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव मॅडम, जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.