देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)
'कृषिभूषण' साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांना, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले 'सन्माननीय सदस्यत्व' नुकतेच प्रदान केले. वाचनालयाच्या नवनिर्वाचित संचालकांनी तालुक्यातील मांडकी-पालवण येथील 'कृषिभूषण' डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेस भेट देऊन डॉ. चोरगे यांना हे सदस्यत्व समारंभपूर्वक प्रदान केले.