चिपळूण /लोकनिर्माण (संतोष तांबे)
आरोग्य केंद्र कापरे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता उन्हाळ्यात त्यात अनकी गंभीर होत होता रुग्णाची व निवासी कर्मचारी यांची गरज ओळखून रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि.प. सदस्या मिनल काणेकर यांनी आरोग्य समिती जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्रश्न उपस्थित केला व त्याचा योग्य पाठपुरावा करून काम मंजूरही करून घेतले या कामाचा शुभारंभ मिनल काणेकर तसेच विजय बांद्रे सरपंच कापरे यांचे हस्ते संपन्न झाला.
या वेळी ग्रा. प. सदस्या आरती भुर्के, जे ई श्री. जोशी, श्री यादव वैद्यकीय अधिकारी, डॉ आमने साहेब आरोग्य सहाय्यक श्री निवेंडकर , श्री जंगम श्रीम. कवठनकर व आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.