चिपळूण /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे पश्चिम बंगालमधून तरूणींना आणून त्यांना अनैतिक व्यवसायात जुंपल्या प्रकरणी या प्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी एका हॉटेल व्यवस्थापकाला अटक झाली असून यामध्ये गुंतलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
विजय प्रल्हाद काकडे (५२, मूळ रा. कराड, सध्या बहाद्दूरशेख नाका चिपळूण) असे अटक केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. काकडे हा शहरातील बहाद्दूरशेखनाका येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहे. काही दिवसांपूर्वी हेल्प फाऊंडेशन या संस्थेने पोलिसांच्या मदतीने खेर्डी येथील अनैतिक व्यवहाराचा प्रकार उघडकीस आणला होता. तसेच पीडीत पश्चिम बंगाल येथील तरूणींची खेर्डी येथील भाजी व्यावसायिकांच्या तावडीतून सुटका केली होती. त्या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार आणि त्यांना अनैतिक व्यवसायाला जुंपल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद वसिम दुवाबक्ष शेख याला अटक केली. त्यापाठोपाठ या व्यवसायात मदत करणारा रिक्षा व्यावसायिक अश्रफ हुसेन चौगुले (३८) यालाही पोलिसांनी अटक केली.