संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त विशेषांकांचा प्रकाशन सोहळा संपन्न


 
( लोकनिर्माण / मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )


 


      ना.स.प. पुणे शहर तर्फे संत नामदेव महाराज विशेषांकाचा  प्रकाशन सोहळा संपन्न झाला.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती सामुदायिक रित्या साजरी न करता पुणे शहरातील सर्व ज्ञाती संस्था यांचे सहकार्याने व नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके व शहर कार्यकारिणी यांच्या पुढाकराने  श्री. संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून, नामदेव महाराजांचे जीवन कार्यावरील विशेषांकाचे  प्रकाशन करून एक आगळा वेगळा उपक्रम यशस्वीपणे राबवून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या समोर आदर्श निर्माण केला. तसेच अॅड. सुधीरदादा पिसे यांचे मार्गदर्शन व  पुणे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर याचे अध्यक्षखाली व नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास यांच्या आशिर्वादाने व उल्हासदादा पवार व शिल्पकार विवेक खटावकर, शाहीर हेमंत मावळे व अॅड. प्रताप परदेशी यांचे शुभहस्ते गुरूवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. श्री राम मंदिर, लष्कर, पुणे येथे  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


       


याप्रसंगी ह.भ.प.ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास यांनी दूरध्वनीवरून उपस्थितांना नामदेव महाराज यांनी भारतभर केलेल्या  कार्याचे तज्ञांचा ज्ञानरूपी सागराचा विशेषांक प्रकाशित केल्यामुळे हा ज्ञानाचा साठा सर्वांच्या जीवनासाठी कल्याणकारी असून या महत्त्वपूर्ण  उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. तसेच उल्हासदादा पवार  म्हणाले की, नामदेव रायांनी समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी चोखोबांच्या समाधी साठी पांडुरंगाच्या मंदिराजवळ स्थान दिले.  ज्या नामदेवरायांनी माऊली ज्ञानेश्वर यांच्या समाधीचा आयोजनाचा अधिकार प्राप्त केला , असा आपल्या जीवनाचे सार्थक होणारा दृष्टांताचा समावेश असणारा विशेषांक नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आहे. तसेच याप्रसंगी विशेषांकाची संपादकीय जबाबदारी उत्तम प्रकारे संभाळून वेळेत विशेषांक प्रकाशित करण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान देणारे ना.स.प. पुणे शहर संस्थेचे सचिव सुभाष वासुदेव मुळे व सौ. शोभा मुळे यांचा पुणेरी पगडी, शाल व श्री फळ देवून प्रमुख पाहुणेच्या हस्ते सपत्निक सत्कार करून उपस्थित पुणे शहरातील २६ ज्ञातीसंस्थाचा स्मृतिचिन्ह देवून करीत असलेल्या सामाजिक कार्याबाबत सत्कार करण्यात आला. तसेच  कार्यक्रम स्थळी समस्त शिंपी समाज महाराष्ट्र यांनी नामदेव मंदिरात दिपोत्सव साजरा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. नामदेव महाराज यांचे जीवन कार्याचा ज्ञानरूपी प्रसाद नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर ही १५०० कुटुंबांना महाराष्ट्रातील घरोघरी मोफत पोहचवणार असल्याची माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहराचे सचिव सुभाष वासुदेव  मुळे यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नामदेव शिंपी समाज लष्कर, उपाध्यक्ष प्रदीप खोले व कुंदन गोरटे, प्रशांत सातपुते, दिंगबर क्षीरसागर, रजनीकांत निखळ, सागर मांढरे, अक्षय मांढरे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केले.अशी माहिती सुभाष वासुदेव मुळे ( सचिव, नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर मो. नं. ९२७२३१७०७२ ) यांनी दिली.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image