कोरोना योध्दा पुरस्कार सन्मान घरोघरी जाऊन सर्व्हे करणारे सिस्टर यांना जाहीर

 

कोरेगांव/लोकनिर्माण ( नामदेव भोसले)


प्राथमिक आरोग्य केंद्र रहिमतपूर संचलित उपकेंद्र कटापूर मधील सिस्टर श्रीमती पी.के.डांगरे मॅडम व सिस्टर श्रीमती एस.टी.खंदारे मॅडम मूळ गांव अमरावती यांना शाल,श्रीफळ,व सन्मानपत्र देऊन उपकेंद्र कटापूर प्रांगणात सन्मानित करण्यात आले . त्यांनी कटापूर,गोडसेवाडी, गोगावले वाडी,एकसळ,न्हाळेवाडी,शिरंबे,वेलंग या गावांत जाऊन घरोघरी कोवीड पेशंट,बी.पी.शुगर,आजारी पेशंटची दखल घेऊन प्रशासनाला व या सात गावातील ग्रामस्थांना उत्तम प्रकारे भरपूर योगदान देऊन सहकार्य दिले. अहोरात्र सेवा देताना अनंत अडचणी दूर सारून मेहनतीने काम केले.या बाबत अखिल भारतीय वारकरी मंडळ कोरेगांव तालुक्याच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.दोघींनी मंडळाचे खुप आभार मानले.आम्हाला या सन्मानामुळे काम करण्याची उर्जा प्राप्त झाली.



 यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.नंदकुमार माळवदे कुमठे, सचिव चंद्रकांत लवळे गोडसवाडी, कार्याध्यक्ष रमेश नाळे कोरेगांव, नामदेवराव भोसले व यलाप्पा बिराजदार शिरंबे, सरपंच इसाक सुतार कटापूर, चेअरमन विठ्ठल केंजळे,ह.भ.प.शंकर शिंदे,किसन केंजळे, जयसिंग केंजळे, माणिक केंजळे, रामचंद्र केंजळे,दादासो केंजळे, ज्ञानेश्वर केंजळे,निवास केंजळे, इत्यादी वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.