दिनांक ८/०८/२०२१
कडवई/ लोकनिर्माण- मुजीब खान
मालगुंड येथील कवी केशव सूत स्मारक परिसरातील स्वच्छता प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री. सुनिल धावडे संस्थापित छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेकडून करण्यात आली.
कोरोनाच्या काळात ही या संस्थेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला.
अभियानाच्या सुरुवातीला कवी केशवसूत स्मारक समितीचे अध्यक्ष श्री.गजानन पाटील साहेब व कार्यवाह किर मॅडम यांनी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे मुख्य सचिव श्री. समीर गोताड आणि प्रवक्ता श्री. संगम धावडे यांच्या पुढाकाराने आणि कवी केशव सूत स्मारकाचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील साहेब व कार्यवाह किर मॅडम यांच्या सहकार्याने अभियानास सुरुवात झाली. त्यामध्ये प्रतिष्ठान च्या सदस्यांनी स्मारकच्या परिसरातील गवत, पडलेली झाडें, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत, वेली यांची स्वच्छता केली. या मोहिमेसाठी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे श्री. सुरज पवार यांनी वस्तुरूपात मोलाचे सहकार्य केले. या अभियानात या संस्थेचे सदस्य प्रशांत कांबळे, संदेश धावडे, राहुल धावडे, विजय धावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.